मोफत फवारणी पंप योजना 2025 Free Favarni Pump
नमस्कार शेतकरी मित्रांनो! भारत हे कृषिप्रधान देश आहे आणि शेतकऱ्यांना शेती करताना विविध उपकरणांची आवश्यकता असते. या गरजा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यांसाठी नियमितपणे विविध योजना राबवते.
Free Favarni Pump त्याच आधारावर, महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण योजना सुरु केली आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांना मोफत फवारणी पंप १००% अनुदानावर दिले जातील.
मोफत फवारणी पंप योजनेची थोडक्यात माहिती
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पिकांचे फवारणी करण्यासाठी फवारणी पंप उपलब्ध करून दिले जातील. महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मोफत १००% अनुदानावर बॅटरी चालित फवारणी पंप दिले जात आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचे व्यवस्थापन करणे सोपे होईल.
तुम्ही योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल, तर लवकरच अर्ज करा कारण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत थोड्या दिवसांत संपणार आहे. शेतकऱ्यांना या योजनेची माहिती देणे महत्वाचे आहे, जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ मिळवता येईल.
मोफत फवारणी पंप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहेत:
- आधार कार्ड
- राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
- चालू सातबारा
- आठ अ उतारा
- कास्ट सर्टिफिकेट (असल्यास, अनुसूचित जाती किंवा जमातीचे प्रमाणपत्र)
- उत्पन्न प्रमाणपत्र (अनुसूचित जाती व जमातीसाठी)
- पॅन कार्ड (असेल तर)
- अपंग प्रमाणपत्र (दिव्यांग शेतकऱ्यांसाठी)
योजनेसाठी पात्रता Free Favarni Pump
- अर्ज करणारा शेतकरी महाराष्ट्र राज्याचा नागरिक असावा.
- शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असावी. (सामायिक जमीन असल्यास, संमती पत्र आवश्यक)
- अनुसूचित जाती किंवा जमातीतील शेतकऱ्यांना जात प्रमाणपत्र आवश्यक.
- शेतकऱ्याने यापूर्वी या योजनेचा लाभ घेतला असल्यास, त्याला पुढील 10 वर्षांपर्यंत त्याच घटकासाठी लाभ मिळणार नाही. मात्र, इतर उपकरणांसाठी अर्ज करता येईल.
ऑनलाइन अर्ज कसा करावा?
शेतकरी वर्ग घरबसल्या आपल्या मोबाइल किंवा लॅपटॉपच्या सहाय्याने सोप्या पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया खाली दिलेल्या पद्धतीने करा:
- सरकारी वेबसाइटवर जा. लिंक खाली दिली आहे.
- वेबसाइटवर जाताच “अर्जदार लॉगिन” ऑप्शनवर क्लिक करा.
- यापूर्वी अर्ज केला असेल, तर लॉगिन करा.
- नव्या अर्जदारांसाठी “नवीन अर्जदार नोंदणी” ऑप्शन वापरून खाते तयार करा.
- अर्जदार नाव, आधार क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती भरून नोंदणी करा.
- मोबाइल नंबर लिंक करून ओटीपीद्वारे मोबाईल नंबर सत्यापित करा.
- आधार प्रमाणीकरण करा आणि त्यानंतर आवश्यक कागदपत्रे भरा.
- पिकांच्या तपशिलांसह जमिनीचा तपशील, बँक खाते माहिती, पॅन कार्ड व इतर आवश्यक माहिती भरा.
- Free Favarni Pump “अर्ज करा” पर्यायावर क्लिक करा आणि अर्ज सबमिट करा.
अर्ज फी आणि अंतिम प्रक्रिया
अर्जाची फी २३ रुपये आहे. फी भरल्यानंतर अर्जाची पावती डाउनलोड करा. अर्ज १५ दिवसांच्या आत मंजूर होईल.
या सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांना मोफत फवारणी पंप योजना वापरून तात्काळ अर्ज करता येईल आणि योजनेचा लाभ मिळवता येईल.